निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३८
आरोग्याविषयी शंकानिरसन
श्री. धनंजय हर्षे : ‘लेखांक १२८’ मध्ये सांधेदुखी इत्यादी विकारांसाठी तीळ चावून खावेत’, असे सांगितले आहे. काहींना दात नसल्याने तीळ चावून खाणे शक्य होत नाही. अशा वेळी काय करावे ?
उत्तर :
‘लसणीच्या २ पाकळ्या सोलून ठेचून १५० मिलि (१ वाटी) तिळाच्या तेलात तळून घ्याव्यात. (लसूण आवडत नसेल, तर तेल गरम करून त्यात पाव चमचा हळद टाकून गॅस बंद करावा.) तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवावे आणि लसणीच्या पाकळ्या टाकून द्याव्यात.
प्रतिदिन सकाळी उठून व्यायाम केल्यावर रिकाम्या पोटी यातील १ ते २ चमचे तेल पिऊन वर वाटीभर गरम पाणी प्यावे.
(हळद आणि तेल मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरावा.)’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)
तुमच्या प्रश्नांतून इतरांनाही शिकता येते.
संपर्क : [email protected] वर कळवा