महागडे विदेशी मद्य जप्त
अजमेर (राजस्थान) – एका औषधनिर्मिती आस्थापनाकडे २ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी येथील पोलीस अधीक्षक दिव्या मित्तल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ दिवसांपूर्वी अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी उदयपूर येथील त्यांच्या ‘फार्महाऊस’ आणि ‘रिसॉर्ट’ यांवर धाड टाकली. तेथून महागडे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. हे रिसॉर्ट दिव्या मित्तल यांचा सहकारी आणि निलंबित पोलीस कर्मचारी सुमित कुमार चालवत होता. या रिसॉर्टवर अनेक राजकारणी आणि काही खास पाहुणे येत होते. अजमेर, उदयपूर, झुंझुनू आणि जयपूर येथील ५ ठिकाणांवर पोलिसांनी धाडी घातल्या असून आणखी मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे. अटक झाल्यानंतर दिव्या मित्तल यांनी ‘वर’पर्यंत पैसे पोचते करावे लागतात’, असे सांगितले होते. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे ‘वर’पर्यंत म्हणजे काँग्रेस सरकारपर्यंत हे पैसे पोचवले जातात का ? याचा शोध कोण घेणार ? – संपादक)
एडिशनल एसपी ने मांगी 2 करोड़ की रिश्वत, गिरफ्तार: दलाल के जरिए मांगे पैसे; ACB ने पांच ठिकानों पर मारा छापा#Jaipur #Rajasthan #ASP #Policehttps://t.co/dKHHOUSbSG pic.twitter.com/dZ88D60Qbi
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) January 16, 2023
संपादकीय भूमिका
|