आरोपींना १५ दिवसांत बेड्या न ठोकल्‍यास महाराष्‍ट्रभर आंदोलन करण्‍याची हिंदु महासंघाची चेतावणी

आळंदीत एकही चर्च उभे रहाणार नाही, याची काळजी हिंदु महासंघ घेईल ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

हिंदू महासंघाने धर्मांतर प्रकरणी आळंदी पोलिसांना निवेदन दिले

पुणे – शिवनेरी ज्‍याप्रमाणे आम्‍हाला प्रिय आहे, त्‍याचप्रमाणे आळंदी हे आमचे श्रद्धास्‍थान असून तिथे एकही चर्च उभे रहाणार नाही, याची काळजी आम्‍ही घेऊ, असे वक्‍तव्‍य हिंदु महासंघाचे अध्‍यक्ष श्री. आनंद दवे यांनी केले आहे. हिंदु महासंघाने धर्मांतरप्रकरणी आळंदी पोलिसांना निवेदन दिले आहे. त्‍यानंतर श्री. आनंद दवे हे प्रसारमाध्‍यमांशी बोलत होते. धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना १५ दिवसांत बेड्या न ठोकल्‍यास आळंदीसह महाराष्‍ट्रभर आंदोलन करण्‍याची चेतावणीही श्री. आनंद दवे यांनी दिली आहे. येथील देवाच्‍या आळंदीतील काही ख्रिस्‍ती धर्मीय हिंदु बांधवांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न करत असल्‍याचे वारंवार समोर येत आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद झाला आहे.

(सोजन्य : लोकसत्ता) 

श्री. आनंद दवे पुढे म्‍हणाले की, आळंदीत सक्‍तीच्‍या आणि फसवणुकीच्‍या धर्मांतराचा प्रयत्न चालू आहे. शिक्षण न झालेल्‍या व्‍यक्‍तींना ‘आर्थिक आमीष दाखवून आणि माझा देव तुझे कल्‍याण करेल, तुझा आजार बरा करेल’, असे आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केला जात आहे. धर्मांतराच्‍या गुन्‍ह्यात पोलिसांनी पुष्‍कळ साधी कलमे लावलेली आहेत. ती कलमे वाढवावीत, यासाठी पोलीस आयुक्‍तांना आम्‍ही भेटणार आहोत.

‘पोलीस हे प्रकरण निष्‍काळजीपणे हाताळत आहेत’, असा आरोप श्री. दवे यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

अशी चेतावणी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना का द्यावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे प्रयत्न का करत नाही ?