सरकारविरोधी प्रसार केल्यावरून सौदी अरेबियामध्ये मौलवीला फाशीची शिक्षा

(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

मौलवी अवाद अल-कार्नी

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियामध्ये सामाजिक माध्यमांचा वापर केल्याच्या गुन्ह्याच्या प्रकरणी अवाद अल-कार्नी नावाच्या ६५ वर्षीय मौलवीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त ‘द गार्डीयन’ दैनिकाने दिले आहे. काही माध्यमांनी अद्याप न्यायालयाकडून शिक्षा घोषित करणे शेष आहे, असेही वृत्त प्रकाशित केले आहे.

मौलवीवर सामाजिक माध्यमांतून सरकारविरोधी बातम्यांचा प्रसार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ९ सप्टेंबर २०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. या मौलवीचे ट्विटरवर २० लाख समर्थक होते. सौदी अरेबियामध्ये सामाजिक माध्यमांचा वापर करणे गुन्हा आहे.