‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाण्‍याचे दुष्‍परिणाम !

‘चायनीज’ पदार्थांची दुकाने देशात विविध शहरांसह खेडेगावांपर्यंत पोचली आहेत. अनेक तरुण रात्री उशिरापर्यंत हे पदार्थ खातांना दिसतात. या पदार्थांमध्‍ये ‘मोनोसोडीयम ग्‍लुटामेट’ (‘अजिनोमोटो’) सारखी रसायने असतात, ज्‍यामुळे हे पदार्थ खाण्‍याचे एका प्रकारे व्‍यसनच लागते. हे खाल्‍ल्‍याने मुलांना घरचे अन्‍न (भाजी-पोळी) खायला आवडत नाही. त्‍यामुळे त्‍यांचे पालक अगदी चिंताग्रस्‍त झाले आहेत.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाल्‍ल्‍याने अपचन, पोटाचे विकार, कृमी (जंत), ‘गॅसेस’, सांध्‍यांचे विकार, जळजळ आणि पित्ताशी संबंधित विकार यांसारखे शारीरिक विकार अन् चिडचिड असे मानसिक विकार होतात. यामुळे ‘असे चायनीज पदार्थ खाऊन आरोग्‍याची हेळसांड करायची ? कि घरचे सात्त्विक अन्‍न खाऊन निरोगी रहायचे ?’, हे प्रत्‍येकाने आपल्‍या सदसद्विवेकबुद्धीने ठरवावे !’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (८.१२.२०२२)