नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणण्यासाठी सहस्रो लोकांनी काढला मोर्चा !

नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली. नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणण्याची तेव्हापासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ११ जानेवारी या दिवशी याच मागणीसाठी सहस्रो नागरिकांनी काठमांडू येथे मोर्चा काढला.

राजे पृथ्वी नारायण शहा यांच्या पुतळ्याजवळ सहस्रोंच्या संख्येने लोक गोळा झाले आणि त्यांनी ही मागणी केली. या दिवशी पृथ्वी शहा यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीच्या वेळी नेहमीच नागरिक राजेशाहीच्या समर्थनार्थ मोर्चे काढत असतात. मागील मोर्च्याच्या वेळी पोलिसांकडून लाठीमार झाला होता.