झारखंडमध्ये ख्रिस्ती पाद्य्राकडून हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर !

ग्रामस्थांचा विरोध

बोकारो  (झारखंड) – येथील देवीपूर गावातील एका घरात ८ जानेवारी २०२३ या दिवशी शेकडो महिला प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र आल्या होत्या. प्रार्थनेच्या नावाखाली हे ख्रिस्त्यांचे धर्मांतराचे षड्यंत्र असल्याचे समजताच ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. प्रार्थनेच्या नावाखाली बाहेरचे ख्रिस्ती पाद्री निरपराध गरीब हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या प्रार्थनेस विरोध केला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

१. गावातील रहिवासी अमित साओ यांनी आरोप केला की, अनेक मासांपासून ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती पाद्री गावात प्रार्थनासभा घेऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हिंदूंना त्यांच्या देवतांची पूजा करण्यापासूनही रोखले आहे.

२. ग्रामस्थांचा विरोध पाहून पोलिसांनी तेथे प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या जमावाला हटवले. या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून उत्तरदायींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !