इस्रायलमध्ये ज्यूंना केंद्रबिंदू ठेवून शालेय अभ्यासक्रम सिद्ध करणार !

तेल अविव – पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आघाडी सरकारमध्ये अनेक प्रखर राष्ट्रवादी पक्षांचा समावेश आहे. नेतन्याहू सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारमधील घटक पक्षांना मंत्रालयांचे वाटप करण्यात आले. प्रखर राष्ट्रवादी असणार्‍या नेत्यांना प्रमुख मंत्रालयांचे दायित्व देण्यात आले आहे. आघाडी सरकारने ‘नॅशनल मिशन’ नावाने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत ज्यूंना केंद्रबिंदू ठेवून त्यांचे समर्थन करणारा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे.
ज्यू समुदायाच्या विरोधातील आंदोलनांना हाताळण्याचे दायित्व ‘नॅशनल मिशन’ या नवीन मंत्रालयाकडे असणार आहे. या मंत्रालयाचे नेतृत्व प्रखर राष्ट्रवादी नेते ऑरिट स्ट्रोक करणार आहेत. अशाच प्रकारे ‘हेरिटेज मंत्रालया’चीही स्थापना करण्यात आली असून राष्ट्रवादी नेते अमिहाई एलियाहू या मंत्रालयाचे दायित्व सांभाळणार आहेत.

संपादकीय भूमिका 

भारतातही हिंदूंना केंद्रबिंदू ठेवून असा अभ्यासक्रम सिद्ध करणे आवश्यक !