धर्मासाठी संघटित होण्याची आवश्यकता ! – शरद राऊळ, हिंदु जनजागृती समिती

परुळे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

वेंगुर्ला – आज हिंदु धर्मावर ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘हलाल’ अर्थव्यवस्था, धर्मांतर, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण आदी अनेक संकटे येत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या धर्माप्रमाणे आचरण करून धर्मासाठी जात, पक्ष, पंथ दूर ठेवून संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरद राऊळ यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

श्री. शरद राऊळ

परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिराच्या सभागृहात २५ डिसेंबर या दिवशी या सभा पार कडली. सभेच्या प्रारंभी श्री. भरत कांबळी यांनी श्री. शरद राऊळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या वेळी श्री. राऊळ यांनी कपाळाला टिळा लावणे, वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे, कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून करणे आदी धर्मचरणाची उदाहरणे दिली. विविध उदाहरणांतून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांचे स्वरूप हिंदू बांधवांसमोर मांडून संघटित होण्याचे आवाहन केले. या सभेला १५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

सभेला उपस्थित धर्मप्रेमी हिंदू

या सभेसाठी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिराच्या व्यवस्थापनाने सभागृह आणि सभेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले, तसेच येथील श्री देव आदिनारायण देवस्थानने बैठकीसाठी सतरंज्या, म्हापण येथील श्री. श्रीकृष्ण ठाकूर यांनी वाहन व्यवस्था, तसेच श्री. गोपाळ जोशी यांनी समितीच्या कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था केली.