वाकवली (दापोली) येथे घरातून २ लाख ८५ सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी

दापोली (जि. रत्नागिरी) – तालुक्यातील वाकवली येथे प्रमोद आंब्रे यांच्या घरातील २ लाख ८५ सहस्र रुपयांचे दागिने चोरट्याने पळवल्याची घटना २८ डिसेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे, याविषयीची तक्रार प्रमोद आंब्रे यांनी पोलीस ठाण्यात दिली.

प्रमोद आंब्रे हे कामावर जातांना त्यांनी घराला कुलूप लावले होते. जातांना त्यांनी घराच्या उजव्या बाजूला सिमेंटचा दरवाजा आडवा करून एका कापडी रुमालात चावी ठेवली होती. ही चावी घेऊन अज्ञाताने दरवाजाचे कुलूप उघडून कपाटात ठेवेलले दागिने आणि रोख रक्कम अज्ञाताने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञातावर भा.दं.वि. कलम ३८०, ४५४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

बंद घरांतील वाढत्या चोर्‍या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !