केरळमधील प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या अधिवक्त्याला अटक !

नवी देहली – केरळमधील प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) एका अधिवक्त्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने)  नुकतीच अटक केली. अटक करण्यात आलेला अधिवक्ता महंमद मुबारक हा एर्नाकुलम जिल्ह्यातील एडवानक्कड येथील रहिवासी आहे. ‘एन्.आय.ए.ने  नुकतेच राज्यातील ५६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेली ही १४ वी व्यक्ती आहे’, असे ‘एन्.आय.ए.’च्या प्रवक्त्याने सांगितले.

पी.एफ्.आय.साठी कार्यरत असलेला मुबारक हा ‘मार्शल आर्ट्स’ आणि ‘हिट स्क्वॅड’चा (हत्या करणार्‍या पथकाचा) प्रशिक्षक आहे. तो केरळ उच्च न्यायालयात वकिली करतो. (बंदी घालण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेचा कार्यकर्ता आणि त्यातही या संघटनेच्या ‘हत्या कशी करावी ?’, या प्रशिक्षण देणारा जिहादी अजूनही वकिली करतो, हे कसे ? – संपादक) त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत घरात लपवून ठेवलेल्या कुर्‍हाडी, तलवार आणि विळा यांसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली. ‘पी.एफ्.आय’ विविध राज्यांमध्ये इतर समुदायातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ‘हिट स्क्वॅड’ सिद्ध करत होते आणि प्रशिक्षण देत होते, अशी माहितीही समोर आली आहे.

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवादी संघटनांवर केवळ बंदी घालून चालत नाही, तर त्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांवर कारवाई करावे लागते, हे मागील काही घटनांवरून स्पष्ट होते. पी.एफ्.आय.चे अस्तित्व नष्ट करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक !
  • विशिष्ट समाजातील लोकांना कितीही शिक्षण दिले, तरी त्यांच्यातील धर्मांधता नष्ट होत नाही आणि ते विघातक कारवायांमध्ये सहभागी होतात, याचे हे उदाहरण ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !