बांगलादेशात कट्टरतावाद्यांनी अपहरण केलेल्या हिंदु तरुणाचा अद्याप शोध नाही !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

हिंदु तरुण बबलू चंद्र शिल

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्यातील बोयलवीर गावामध्ये २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु तरुण बबलू चंद्र शिल याचे इस्लामी कट्टरवाद्यांनी अपहरण केले; मात्र ३५ दिवस उलटून गेले, तरी पोलीस त्याचा शोध लावू शकलेले नाहीत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली.