चीनने तैवानमध्ये घुसून केला युद्धाभ्यास !

बिजिंग – चीनने गेल्या २४ घंट्यात तैवानजवळ ७१ लढाऊ विमानांसह सागरी आणि हवाई कवायती केल्या. चीनने अनेक लढाऊ विमाने तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसवली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने हा चीनचा सर्वांत मोठा घुसखोरीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या चिथावणीच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून आपण सागरी आणि हवाई कवायती केल्याचा दावा चिनी सैन्याने केला आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अमेरिकेने त्याच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये तैवानसाठी ८२ सहस्र कोटी रुपये साहाय्य देण्याची तरतूद केली आहे. चीन ते कदापी सहन करणार नाही.’ ‘अल् जजीरा’च्या वृत्तानुसार, तैवानने म्हटले आहे की, चीन संपूर्ण प्रदेशाची शांतता धोक्यात आणत आहे आणि तेथील लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचे सैन्य प्रवक्ते शी यी म्हणाले की, आमचे सैन्य देशाच्या अखंडतेसाठी आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत रहातील.

संपादकीय भूमिका

चीनचे विस्तारवादी धोरण पहाता त्याने तैवान कह्यात घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !