नाट्यमय घडामोडीनंतर पुष्पकमल दहल प्रचंड बनले नेपाळचे पंतप्रधान !

  • चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !

  • भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल

काठमांडू (नेपाळ) – नाट्यमय घडामोडीनंतर ‘सी.पी.एन् माओवादी’ पक्षाचे नेते  पुष्पकमल दहल प्रचंड नेपाळचे पंतप्रधान बनले. नेपाळमध्ये झालेल्या मध्यवर्ती निवडणुकीत नेपाळी जनतेने नेपाळी काँग्रेसचे नेते तथा भारतसमर्थक शेर बहादुर देउबा यांच्या बाजूने कौल दिल्याने त्यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र होते. प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेससमवेत निवडणुकीपूर्वी आघाडी केली होती; परंतु त्यांनी एकाएकी कोलांटीउडी मारत चीनसमर्थक माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याशी हातमिळवणी करून स्वतःकडे पंतप्रधानपद ठेवले. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी या आता प्रचंड यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील. प्रचंड हे तिसर्‍यांदा नेपाळचे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांनी स्वतःला ७ पक्षांच्या मिळून १६६ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

प्रचंड आणि देउबा यांच्या आघाडीने निवडणुकी सर्वाधिक जागांवर विजय मिळवला होता.

संपादकीय भूमिका

नेपाळमधील चीनाचा वाढता प्रभाव पहाता भारतसमर्थक देउबा यांना पंतप्रधान बनू न देण्यामागे चीनचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! भारताने आता अधिक सतर्क रहाणे आवश्यक !