उत्तरप्रदेशातील मांस व्यावसायिक कुरेशी याच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

१ सहस्र २०० कोटी रुपयांची कर चुकवल्याचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील मांस व्यावसायिक हाजी शकील कुरेशी याच्या लक्ष्मणपुरी, बरेली आणि उन्नाव येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घातल्या. १ सहस्र २०० कोटी रुपयांच्या आयकर न भरल्याच्या प्रकरणी या धाडी घालण्यात आल्या.  आयकर विभागाला ३ दिवस करण्यात आलेल्या चौकशीतून सुमारे १ सहस्र कोटी रुपयांच्या अवैध व्यवहाराविषयी पुरावे मिळाले आहेत.