अमेरिका सुरक्षेसाठी आम्हाला अर्थसाहाय्य करणार !

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा दावा !

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सीमेवर सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आतंकवाद रोखण्यासाठी पाकिस्तानला अर्थसाहाय्य करण्यास मान्यता दिली आहे, असा दावा पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केला आहे. भुट्टो यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकाचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या खासदारांशी पाकला सुरक्षेसाठी अर्थसाहाय्य करण्याविषयी चर्चा केली होती.

भुट्टो म्हणाले की, अमेरिकेचे खासदार बॉब मेनेंडेज आणि लिंडसे ग्रॅहम यांनी वर्ष २०२३ च्या अर्थसंकल्पात पाकिस्तानला सुरक्षेसाठी पैसे देण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • जर अमेरिका असे करत असेल, तर तिला हे ठाऊक असले पाहिजे की, हा पैसा भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठीच खर्च केला जाणार आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेला याविषयी जाणीव करून दिली आहे. तरीही अमेरिका पुन्हा तीच गोष्ट करणार असेल, तर भारताने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !