(म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध आणि सीमेवर शांतता राखण्यास आम्ही कटीबद्ध आहोत !’ – चीन  

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

बीजिंग (चीन) – चीन भारतासमवेत असलेले संबंध चांगले, स्थिर आणि भक्कम करण्यासाठी सिद्ध आहे. त्याचसमवेत भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील भागात शांतता राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे वक्तव्य चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील सीमेवर भारतीय सैन्याने चीनच्या घुसखोरी करणार्‍या सैनिकांना चोपल्यानंतर प्रथमच चीनकडून अशा प्रकारचे विधान करण्यात आले आहे.

पत्रकारांना संबोधित करताना वांग म्हणाले की, चीन आणि भारत यांनी राजकीय आणि सैनिकी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवला आहे. दोन्ही देश सीमावर्ती भागात स्थिरता राखण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही एकत्र काम करण्यास सिद्ध आहोत.

संपादकीय भूमिका

  • ‘हिंदी-चीनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करून सहस्रो चौरस किलोमीटर भूमी गिळंकृत करणार्‍या चीनच्या अशा विधानावर शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवेल का ? अशा चीनपासून भारताने नेहमीच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !