बांगलादेशी हिंदूंना भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो !  – व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज

बांगलादेशी मुसलमानांना मात्र सहज व्हिसा मिळत असल्याचा दावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. भारत सरकार हिंदूंशी भेदभाव का करते ? बांगलादेशी हिंदू केवळ तीर्थयात्रेसाठी भारतात येतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे, असे ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानबहुल बांगलादेश आणि पाकिस्तान येतील अल्पसंख्यांक हिंदू भारताकडे आशेचा किरण म्हणून पहात असतात. त्यांना भारताकडून अशी वागणूक मिळणे अपेक्षित नाही !