(म्हणे) ‘मोदी, भाजप आणि रा.स्व. संघ यांना घाबरत नाही !’

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची दर्पोक्ती !

डावीकडून पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा पक्ष भाजप आणि रा.स्व. संघ यांना घाबरत नाही. २ दिवसांपूर्वी जे काही बोललो ते इतिहासानुसार होते आणि इतिहास पुसून टाकणे अतिशय अवघड आहे, असे फुकाचे विधान पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केले आहे. २ दिवसांपूर्वी बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हटले होते, ‘ओसामा बिन लादेन तर मेला; पण गुजरातचा कसाई अजूनही जिवंत असून तो भारताचा पंतप्रधान आहे.’ यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभरात बिलावल भुट्टो यांच्या विरोधात निदर्शने केली होती. याविषयी न्यूयॉर्कमध्ये प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी वरील विधान केले. तसेच ‘या आंदोलनांचा उद्देश पाकिस्तानला घाबरवण्याचा आहे; पण ते चालणार नाही’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका 

भुट्टो यांचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो हेही भारताविषयी अशीच दर्पोक्ती करत होते. त्यांना भारताने वर्ष १९७१ च्या युद्धात धूळ चारली होती, हे बिलावल भुट्टो विसरले असतील, तर त्यांना त्याची पुन्हा आठवण करून द्यावी लागेल !