धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येणे !

भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

‘रतलाम (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील सुराना येथील गावात धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या छळाला कंटाळून तेथील हिंदूंनी धर्मांधांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. ‘आम्हाला साहाय्य न केल्यास आम्ही ३ दिवसांत आमचे घर, शेती आणि संपत्ती सर्व सोडून गावातून पलायन करू’, अशी चेतावणी हिंदूंनी या पत्राद्वारे दिली आहे. या गावाची लोकसंख्या २ सहस्र २०० इतकी आहे. त्यांपैकी ६० टक्के लोकसंख्या मुसलमान, तर ४० टक्के हिंदू आहेत. या पत्राची नोंद घेऊन रतलामचे जिल्हाधिकारी या गावाला भेट देणार आहेत. गावात धर्मांधांकडून हिंदूंना धमकावणे, त्यांना मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार नित्याचे झाल्यामुळे तेथील हिंदू दहशतीखाली वावरत आहेत. (सुराना (मध्यप्रदेश) गाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? भारतात धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे ते उद्दाम झाले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)’