बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणार्‍यांच्या सुटकेच्या विरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये दंगलीच्या वेळी बिल्किस बानो यांच्यावरील सामूहिक बलात्कार, तसेच १४ जणांची हत्या यांच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची गुजरात सरकारने १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी सुटका केली.

याविरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर कारागृहातून सोडण्यात आले होते. त्यांनी १४ वर्षे शिक्षा भोगली आहे.