शाईफेक प्रकरणातील तिघांवर लावलेले ३७० कलम हटवले !

पुणे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणार्‍या तिघांवर ३७० कलमासह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता; मात्र त्यातील ३७० कलम, म्हणजे ‘हत्येचा प्रयत्न’ हे कलम कमी केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यावर तिघांना घटनास्थळावरून कह्यात घेतले होते.