साधकांना येणार्‍या अडचणींमागची सूक्ष्मातील कारणे जाणून त्या दूर होण्यासाठी अचूक उपाययोजना सांगणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातील जाणण्याचे अफाट सामर्थ्य !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. घराच्या खालची टाकी पाण्याने पूर्णपणे भरली असूनही घराच्या आगाशीतील टाकीत पाणी न चढणे, ‘मेकॅनिक’ने ‘पंप ठीक असून काहीतरी दुसरी अडचण आहे’, असे सांगणे

‘एप्रिल २०१६ मध्ये आमच्या मुलाच्या (चि. सिद्धेश याच्या) विवाहानिमित्त आमच्याकडे बरेच पाहुणे आले होते. सिद्धेशच्या लग्नाच्या २ दिवस आधी आमच्या घराच्या आगाशीतील टाकीतील पाणी अकस्मात् संपले; म्हणून आम्ही पंप चालू केला; पण पाणी वरच्या टाकीत चढत नव्हते.

श्री. प्रकाश करंदीकर

आम्ही ‘खालच्या टाकीत पाणी आहे का ?’, ते पाहिले. तेव्हा आम्हाला ‘खालची टाकी पाण्याने पूर्णपणे भरली आहे’, असे दिसले. पंपात बिघाड असेल; म्हणून आम्ही ‘मेकॅनिक’ला (पंप दुरुस्त करणार्‍या) व्यक्तीला बोलावले. त्यांनी सर्व पडताळून पाहिल्यावर सांगितले, ‘‘पंप तर ठीक आहे, काहीतरी दुसरी अडचण आहे.’’

सौ. छाया करंदीकर

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना अडचण सांगितल्यावर त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगणे आणि त्यानुसार केल्यावर २० मिनिटांतच आगाशीतील टाकी पाण्याने पूर्णपणे भरणे

‘मेकॅनिक’चे बोलणे ऐकून ‘काहीतरी आध्यात्मिक स्तरावरची अडचण असू शकते’, असे आम्हाला वाटले. तेव्हा आम्ही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून पाण्याची अडचण सांगितली. त्या आमचे बोलणे ऐकून लगेच म्हणाल्या, ‘‘तुम्ही एक नारळ आणि एक उदबत्ती घेऊन खालच्या टाकीकडे जा. तिथे स्थानदेवतेला प्रार्थना करून नारळ वाढवा आणि उदबत्ती ओवाळा. मग बघूया, काय होते ते.’’ आम्ही त्यांनी सांगितल्यानुसार केले आणि ‘पंप चालू होतो का ?’, ते पाहिले. आश्चर्य म्हणजे पंप लगेचच चालू झाला आणि २० मिनिटांतच आगाशीतील टाकी पाण्याने पूर्णपणे भरली.

या प्रसंगातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे सूक्ष्मातून जाणण्याचे अफाट सामर्थ्य आणि ‘अडचणी दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील कोणते उपाय करायला हवेत ?’, याचे त्यांना असलेले अफाट ज्ञान, यांची आम्हाला प्रचीती आली.

आमची परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. प्रकाश करंदीकर (वय ६५ वर्षे) आणि सौ. छाया करंदीकर (वय ६१ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (२७.११.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक