निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०८
‘बासुंदी, खीर, पेढा, आईस्क्रीम इत्यादी दुधाचे पदार्थ खातांना सोबत आंबट किंवा खारट पदार्थ नसावेत. पुरी, पोळी, ब्रेड आणि अन्य गोड पदार्थ यांसोबत हे दुधाचे पदार्थ चालू शकतात. एका घरगुती कार्यक्रमामध्ये जेवणावळीला अन्य पदार्थांसह बासुंदी आणि सोलकढी (आमसुलाची कढी) हे पदार्थ होते. त्या दिवशी ते पदार्थ एकत्र खाल्लेल्या सर्वांना उलट्या आणि अतीसार (जुलाब) झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्यामुळे जेवतांना दुधाचे पदार्थ असल्यास काळजी घ्यावी.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२२)