निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी दिल्याने इस्लाम दुर्बल होईल !

कर्णावती (गुजरात) येथील जामा मशिदीच्या इमामाचा दावा !

कर्णावती (गुजरात) – येथील जामा मशिदीचे इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी (इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) यांनी जमालपूर मतदारसंघात मुसलमानांनी त्यांचे प्रतिनिधित्व करील, अशा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी आणखी एक विधान केले आहे. ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देणारे इस्लामच्या विरुद्ध आहेत आणि ते इस्लामला दुर्बल करत आहेत.

इमाम सिद्दीकी म्हणाले की, तुम्ही मशिदीमध्ये पाहिले आहे की, एकही महिला नमाजपठणासाठी येत नाही. जर इस्लाममध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी येण्याची अनुमती असती, तर मशिदीतही त्यांना येण्याची अनुमती देण्यात आली असती. मशिदीत येण्यापासून त्यांना बंदी आहे; कारण महिलांना इस्लाममध्ये स्थान आहे. त्यामुळे  निवडणुकीमध्ये जे महिलांना उमेदवारी देतात ते इस्लामच्या विरोधात बंडखोरी करत आहेत. ‘तुम्हाला कुणी पुरुष भेटला नाही म्हणून तुम्ही महिलांना आणत आहात का ?’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

महिलांना तिहेरी तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, अनेक बायका करणे, लव्ह जिहाद करून हिंदु मुलींवर अत्याचार करणे, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?, याचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे !

(निकाह हलाला म्हणजे तलाक दिलेल्या पतीशी पुन्हा विवाह करण्यासाठी अन्य पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे)