नोटिशीच्या उत्तराने विद्यापीठ असमाधानी !
नागपूर – येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठातील ७ विभागप्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी विद्यापिठातील जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करत विद्यापीठ प्रशासनाने त्यांना ७ जानेवारी २०२३ पर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. हे गंभीर प्रकरण असतांनाही विद्यापिठाकडून धवनकर यांची पाठराखण करण्यात येत आहे, असा आरोप केला जात होता. त्यानंतर राज्य सरकारनेही या प्रकरणात लक्ष दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने वरील कारवाई केली.
(सौजन्य : MaharashtraTV24)
प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांना ७ जानेवारी २०२३ पर्यंत विद्यापीठ परिसरातही बंदी घालण्यात आली आहे. डॉ. धर्मेश धवनकर यांच्या विरोधात विद्यापिठातील ७ विभागप्रमुखांनी कुलगुरूंकडे एकत्रितपणे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार धवनकर यांनी विभागप्रमुखांना खोट्या तक्रारींची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली केली आहे, असा आरोप आहे. विद्यापीठ प्रशासनाने प्रारंभी याकडे दुर्लक्ष केले; मात्र माध्यमांमध्ये वृत्ते प्रसिद्ध झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने धवनकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. प्रारंभी उत्तर देण्यासाठी ३ दिवसांची वेळ देण्यात आली होती.
हे ही पहा –
— Devesh Gondane (@GondaneDevesh) November 28, 2022
———————————————–