अंदमान – ‘जी २०’ देशांच्या प्रतिनिधी मंडळाने भारतात येताच थेट अंदमानातील ‘सेल्युलर’ कारागृहाला नुकतीच भेट दिली. याच कारागृहात अन्यायी इंग्रजांनी थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ठेवले होते.
या प्रतिनिधी मंडळात भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स अॅलीस, रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव, जर्मनीचे राजदूत डॉ. पी. एकरमैन, भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत बैरी ओफारेल आदींचा समावेश होता. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह येते असलेल्या हॅवलॉक द्वीप येते २६ नोव्हेंबरला ‘जी-२०’ देशांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे २५ नोव्हेंबरला वरील प्रतिनिधींनी ‘सेल्युलर’ कारागृहात भेट दिली. भारतावर इंग्रजांची राजवट असतांना इंग्रजी राजसत्तेला ज्यांच्यापासून धोका आहे, अशांना या कारागृहात ठेवले जात होते.
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार कुलदीप राय शर्मा म्हणाले, ‘‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती की, या परिषदेची एक तरी बैठक अंदमानात ठेवावी आणि आज खरोखरच त्याप्रमाणे होत असल्याचे पाहून आनंद झाला.’’
G-20 leaders start India visit by visiting cellular jail, the prison where Veer Savarkar spent a decadehttps://t.co/cQs0EmbmS8
— OpIndia.com (@OpIndia_com) November 27, 2022
पुढील वर्षी भारत करणार ‘जी-२०’ देशांच्या २०० बैठकांचे नेतृत्व !
इंडोनेशियातील बाली येथे नुकत्याच झालेल्या ‘जी-२०‘ देशांच्या शिखर परिषदेत पुढील वर्षासाठी या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले. त्यामुळे येत्या वर्षभरात भारत या परिषदेच्या २०० बैठकांचे नेतृत्व करेल.
संपादकीय भूमिका
|