नमाजपठणाला विरोध दर्शवण्यासाठी माजी सैनिक करत होता मंत्रोच्चार !
(पेंट्रीकार म्हणजे रेल्वेगाडीतील स्वयंपाकघर)
आमला (मध्यप्रदेश) – ‘स्वर्ण जयंती एक्सप्रेस’ गाडीमध्ये नमाजपठणावरून झालेल्या वादातून निवृत्त सैनिकाला गाडीतील पेंट्रीकार चालकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर २ जणांना अटक करण्यात आली, तर १ जण पसार झाला आहे. विलास नायक असे या निवृत्त सैनिकाचे नाव आहेत. ते विशाखापट्टणम् येथे जात असतांना ही घटना घडली. नायक या मारहाणीत घायाळ झाले. त्यांना रेल्वे पोलिसांनी बैतूल जिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.
Look at this, even on the train, the bullying will continue everywhere because Hindus are not united.
Visakhapatnam ‘Swarna Jayanti Express’ @RailMinIndia pic.twitter.com/dMhNFR4Mxq
— ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳 (@AdvAshutoshBJP) November 21, 2022
१. विजय नायक यांनी गाडीच्या मार्गिकेमध्ये नमाजपठण करणार्या मुसलमानांकडे जाण्यासाठी वाट मागितली. ती त्यांनी दिली नाही. त्यामुळे विरोध दर्शवण्यासाठी नायक तेथे मंत्रोच्चार करू लागले. तेव्हा तेथे पेंट्रीकार चालक आले आणि त्यांना नायक यांना विरोध केला. तेव्हा त्यांच्यात वाद होऊन पेंट्रीकारवाल्यांनी नायक यांना मारहाण केली. या प्रकरणी आमला येथे पेंट्रीकार चालक आणि त्यांचा व्यवस्थापक यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यावर पेंट्रीकार व्यवस्थापक हरवेश श्रीवास आणि विक्रेता पवन यांना अटक करण्यात आली, तर एक जण पसार झाला.
२. याविषयी नायक म्हणाले की, नमाजपठण करणारे कुणालाही प्रसाधनगृहात जायला रस्ता देत नव्हते. त्यामुळे माझ्यातील सैनिक जागा झाला आणि मी त्यांना विरोध केला. मीही वाटेत बसताच पेंट्रीकार कर्मचारी आले आणि त्यांनी मला बाजूला व्हायला सांगितले. ‘रेल्वेत नमाजपठण होऊ शकते; तर मंत्रोच्चार का नाही ?’, असा वाद मी घालू लागताच त्यांनी मला मारहाण केली.
३. नमाजपठण करणार्यांपैकी एकाने सांगितले की, आम्ही नमाजपठण झाल्यावर आमच्या जागेवर बसलो होतो. नंतर पेंट्रीकारवाल्यांनी आमच्याशी वाद घालणार्याला रस्त्यातून उठायला सांगितले. आम्ही निमित्तमात्र आहोत. आमचा या वादाशी संबंध नाही.
(सौजन्य : Speed News Live 24)
संपादकीय भूमिकानमाजपठणाला अनुमती देणारे हिंदु पेंट्रीकार चालक हिंदूंना मात्र विरोध करतात ! असे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! |