चैतन्यमय वाणीने सत्संगामध्ये साधकांना मार्गदर्शन करून त्यांची प्रगती करून घेणार्‍या देवद आश्रमातील सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

देवद, पनवेल येथील सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार कार्तिक कृष्ण एकादशी (२०.११.२०२२) या दिवशी ३३ वा वाढदिवस झाला. पू. (सौ.) अश्विनी पवार देवद येथील स्वयंपाकघरातील साधिकांचे नियमित सत्संग घेतात. सत्संगामध्ये पू. (सौ.) अश्विनीताई साधकांना येणार्‍या अडचणी, साधकांच्या चुका, त्यांनी करावयाच्या उपाययोजना इत्यादींविषयी मार्गदर्शन करतात. त्या घेत असलेल्या सत्संगांविषयीश्री. शंकर नरूटे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. पू. (सौ.) अश्विनी पवार मार्गदर्शन करत असतांना सर्व साधकांच्या अंतर्मनातील दोष आणि अहं यांचा मळ निघत असल्याचे जाणवणे 

‘सत्संगात एखाद्या साधकाने चूक सांगितल्यावर पू. (सौ.) अश्विनीताई (पू. (सौ.) अश्विनी पवार) त्याविषयी मार्गदर्शन करत असतांना अन्य साधकांना स्वतःच्या अंतर्मनातील दोष आणि अहं यांचा मळ निघत असल्याचे जाणवते. त्यामुळे साधक अंतर्मुख होतात.

२. ‘आश्रमात आलेल्या प्रत्येक जिवावर भगवंताची कृपा व्हायला हवी’, या दृष्टीने पू. (सौ.) अश्विनीताई सतत प्रयत्न करतात.

३. साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करणे  

काही साधकांना ‘आपली अडचण सांगायला हवी’, हे लक्षात येत नाही. अशा वेळी त्या साधकाच्या बोलण्यातून, तसेच अन्य साधकांच्या बोलण्यातूनही ‘त्या साधकाला काही अडचणी आहेत का ?’, हे  पू. (सौ.) अश्विनीताई सहजतेने समजून घेतात आणि त्या साधकाला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करतात.

४. साधनेतील बारकावे सांगून साधकांना मार्गदर्शन करणे

‘प्रत्येक सूत्र आध्यात्मिक स्तरावर कसे असायला हवे ?’, यादृष्टीने पू. (सौ.) अश्विनीताईंचे प्रयत्न असतात. ‘साधकांनी साधनेच्या दृष्टीने कसा विचार करायला हवा ? सर्वांनी एकमेकांविषयी कशा प्रकारे विचार करायला हवा ? प्रत्येक सूत्राकडे साधना म्हणून कसे पहायला हवे ?’, असे साधनेतील सर्व बारकावे सांगून त्या साधकांना मार्गदर्शन करतात.

५. साधकांच्या प्रगतीचा ध्यास असणे 

पू. (सौ.) अश्विनीताईंना साधकांच्या प्रगतीचा ध्यास आहे. त्यामुळे साधकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना योग्य ती उपाययोजना काढून देऊन आश्वस्त करणे, यासाठी पू. ताई तळमळीने प्रयत्न करत असतात. अडचणी सुटल्याने साधकही समाधानी आणि निश्चिंत होऊन साधना करतात.

६. साधकांमध्ये जाणवलेले पालट

पू. (सौ.) अश्विनीताई यांच्या मार्गदर्शनामुळे साधकांना साधनेची दिशा मिळून त्यांच्यात आता पालट जाणवायला लागले आहेत. साधकांची अंतर्मनातून साधना होत आहे.

७. अनुभूती 

‘पू. (सौ.) अश्विनीताई घेत असलेल्या सत्संगाला ‘साक्षात् देवता आल्या आहेत’, असे वाटते.’

– श्री. शंकर नरूटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.९.२०२१)