लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा परभणी येथे हिंदु धर्मरक्षण भव्य मूक मोर्चा !

सहस्रो हिंदूंची उपस्थिती

परभणी – लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने परभणीत २० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी सहस्रो हिंदूंची उपस्थिती लाभली होती. शनिवारबाजार मैदानापासून या मोर्च्यास प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर याचा समारोप झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, कराड येथील श्री. सागर आमले, सांगली येथील श्री. मिलिंद तानवडे यांच्यासह शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार श्री. राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोर्च्याला भाजप, शिवसेना यांच्यासह सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह अन्य हिंदूंनी पाठिंबा दर्शवला.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ?