इराक आणि सीरिया येथील आतंकवादी तळांवर हवाई आक्रमण !

इस्तंबूलमधील बाँबस्फोटाचा तुर्कीयेने उगवला सूड !

इस्तंबूल (तुर्कीये) – तुर्कीये देशाने त्याची राजधानी इस्तंबूल येथे १३ नोव्हेंबरला झालेल्या बाँबस्फोटाचा सूड उगवण्यासाठी १९ नोव्हेंबरला रात्री उत्तर सीरिया आणि उत्तर इराक येथील कुर्द आतंकवाद्यांच्या तळांवर हवाई आक्रमण केले. ‘या तळांवरूनच आतंकवाद्यांनी इस्तंबूलवरील आतंकवादाची योजना आखली होती’, असे तुर्कीयेच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

इस्तंबूल येथील बाँबस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८१ जण घायाळ झाले होते. तुर्कीये सरकारने या आक्रमणासाठी ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ आणि ‘सीरियन कुर्दिश वायपीजी मिलिशिया’ या संघटनांना उत्तरदारयी ठरवले होते.

संपादकीय भूमिका

तुर्कीयेने त्याच्या देशात एक आतंकवादी आक्रमण झाल्यावर लगेच आतंकवाद्यांच्या तळावर अशा प्रकारे आक्रमण केले. याउलट भारतात गेली ३ दशके याहून मोठमोठी आक्रमणे होत असतांना कधी पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांवर आक्रमण करण्यात आले नाही, हे लक्षात घ्या !