गुरुग्राम येथे गोतस्करांनी धावत्या गाडीतून रस्त्यावर फेकल्या गायी !

  • गोरक्षकांनी पाठलाग करून गोतस्करांना पकडले !

  • पाठलागाच्या वेळी गोतस्करांकडून गोरक्षकांवर दगडफेक

प्रतिकात्मक छायाचित्र

गुरुग्राम (हरियाणा) – येथे गोतस्करांच्या गाडीचा पाठलाग करणार्‍या गोरक्षकांवर गोतस्करांनी दगडफेक, काचेचे तुकडे, तसेच गोट्या फेकल्या. यात २ गोरक्षक घायाळ झाले. तसेच त्यांच्या वाहनाचीही हानी झाली. पाठलाग करण्यात येत असल्याने गोतस्करांनी त्यांच्या गाडीतील गायींना रस्त्यावर फेकले. शेवटी यातील सलीम, साद आणि महबूब या तिघांना पकडण्यात आले, तर तिघे पळून गेले.

या गोतस्करांनी गुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधून गायी चोरल्या होत्या. याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी गोतस्करांच्या वाहनाला अडवण्यासाठी सोहना रस्त्यावर अडथळे निर्माण केले होते. जेव्हा गोतस्करांची गाडी तेथे आली, तेव्हा त्यांनी हे अडथळे उडवून देत गाडी पुढे पळवली. यानंतर गोरक्षकांनी त्यांचा वाहनाद्वारे पाठलाग चालू केला. २५ किलोमीटरपर्यंत हा पाठलाग चालू होता. शेवटी त्यांना पलवल या भागात पकडण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • गायींना धावत्या गाडीतून अमानुषपणे रस्त्यावर फेकणार्‍या गोतस्करांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायद्यात पालट करावा, असेच गोप्रेमींना वाटते !