डोनाल्ड ट्रम्प वर्ष २०२४ ला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ष २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ‘अमेरिकेला महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी राष्ट्राध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी घोषित करत आहे’, असे ट्रम्प यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीची घोषणा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले प्रमुख उमेदवार ठरले आहेत.