१. पू. रत्नाताई म्हणजे अनेक गुणरूपी रत्नांची माळ !
‘प्रेमभाव आणि शिस्त’, ‘मनमोकळेपणा अन् तारतम्य बाळगणे’, ‘स्थिरता अन् तत्परता’ इत्यादी गुण एकत्रित अंगी असणे क्वचित्च पहायला मिळते. पू. रत्नाताईंनी असे गुण सहजतेने आत्मसात् केले आहेत.
२. साधकांना सेवेची गोडी लावणे
त्यांच्यातील ‘उत्तम निर्णयक्षमता, अभ्यासू वृत्ती, संयम, कुठलाही निर्णय पूर्ण विचारांती घेणे, समष्टीचा सर्वतोपरी विचार करणे, दूरदृष्टी’, या गुणांमुळे त्यांनी संगणकीय सेवेत सुलभता आणून साधकांना सेवेची गोडी लावली.
३. साधकांना साधनेत साहाय्य करणे
पू. ताईंचा साधकांच्या मनाच्या स्थितीचा अभ्यास चांगला असल्याने त्या घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून आम्हाला उभारी मिळते आणि साधकांना साधनेत पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी साहाय्य होते.
४. संतांचे मन जिंकणे
त्यांच्यातील ‘नम्रता, आज्ञापालन, मनमोकळेपणा, प्रेमभाव, साधकांना सर्वतोपरी साहाय्य करणे’ इत्यादी गुणांमुळे त्यांनी संतांचे मन जिंकून अल्पावधीतच गुरुदेवांचा कृपाप्रसाद प्राप्त केला आहे.
अशा आदर्शवत् पू. ताई आम्हाला लाभल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज. (८.३.२०२२)