देवा, अखंड गुरुनाम मुखी रहावे ।

‘आपले जीवन सर्वस्वी गुरुचरणी समर्पित करायचे आहे’, हा विचार कु. वैदेही शिंदे यांच्या मनात येताच त्यांना स्फुरलेले काव्य पुढे दिले आहे.

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

देवा, ध्यास लागो या जिवा तुला पहाण्याचा ।
अन् चराचरात तुला अनुभवण्याचा ।। १ ।।

ध्येयाने प्रेरित होऊन मन भावभक्तीने लीन व्हावे ।
सेवा अन् साधनेच्या विचारांनी मन व्यापून जावे ।। २ ।।

मला साधनेच्या ध्येयाने प्रेरित होता येऊ दे ।
तुला अपेक्षित सर्व घडावे अन् मला ते स्वीकारता यावे ।। ३ ।।

सेवेत तन-मन झिजून जावे ।
ध्येयप्राप्तीच्या ध्यासाने मन व्याकुळ व्हावे ।। ४ ।।

देवा, अखंड गुरुनाम मुखी रहावे ।
हीच प्रार्थना करते तव चरणी ।। ५ ।।

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (३०.१०.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक