उदयपूर येथील रेल्वे रुळावरील स्फोटामागे जिहादी आतंकवादी !

जयपूर (राजस्थान) – येथील ओडा पुलावर उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गाच्या रुळावर १२ नोव्हेंबरला झालेल्या स्फोटामागे जिहादी आतंकवादी असल्याचे समोर आले आहे. या स्फोटामागे आतंकवाद्यांची स्फोट करण्याची नवीन पद्धत असण्याची शक्यता आहे. यात हे आतंकवादी भारतविरोधी मजकूर प्रसारित करणार्‍यांवर किंवा त्यावर प्रतिक्रिया देणार्‍यांवर लक्ष ठेवता, अशांशी संपर्क साधतात आणि त्यांचा विश्‍वास संपादन केल्यावर त्यांना आतंकवादी घटनेसाठी सिद्ध करतात.

हा स्फोटही आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या अशाच स्थानिकांनी स्फोट घडवून आणला आहे. घटनास्थळी अन्वेषण यंत्रणांनी ‘डिटोनेटर’चे अवशेष, तसेच काही जिवंत ‘डिटोनेटर’ जप्त केले आहेत. प्राथमिक अन्वेषणात गुजरात आणि महाराष्ट्र येथील कापसाच्या अनेक गोदामांना आग लागल्याच्या घटनांमागेही अशांचाच हात असल्याचे समोर आले होते.