अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर

झारखंडमध्ये धर्मांतराचे प्रकरण उजेडात

अल्पवयीन मुलीची सुटका करून अपहरणकर्त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी विविध हिंदू संघटनांचे उपोषण

रांची (झारखंड) – झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप अपहरण झालेल्या मुलीच्या आईने केला आहे. ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी केरेदरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिने शाहिद अन्सारी, अरबाज अन्सारी आणि ‘मुस्लिम अंजुमन समिती’चे सदस्य यांची नावे दिली आहेत. ‘आरोपींनी ६ मासांपूर्वी मुलीला पळवून देण्याची धमकी दिली होती’, असा आरोप पीडित हिंदु मुलीच्या आईने तक्रारीत केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

अल्पवयीन हिंदु मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत

या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी शाहिद, त्याचा चुलत भाऊ अरबाज आणि त्यांचे ४ अज्ञात साथीदार यांनी घरात घुसून १६ वर्षांच्या मुलीचे बळजोरीने विवाह करण्याच्या हेतूने अपहरण केले. अपहरणाच्या वेळी आरोपींनी पीडितेच्या घरातून ३ लाख ३० सहस्र रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ सहस्र रुपये रोख रक्कम पळवली.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादपासून हिंदु मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !