ब्रसेल्स (बेल्जियम) येथे ‘अल्लाहू अकबर’ घोषणा देत पोलीस अधिकार्‍याची हत्या

मारेकर्‍याकडून पोलिसांना हत्येची पूर्वकल्पना

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे ‘अल्लाहू अकबर’ घोषणा देत पोलीस अधिकार्‍याची हत्या

ब्रसेल्स (बेल्जियम) – येथील रेल्वे स्थानकाबाहेर एका पोलीस अधिकार्‍याची आक्रमणकर्त्याने ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत चाकूद्वारे गळ्यावर वार करून हत्या केली. तसेच दुसर्‍यावरही वार केले, त्यात तो घायाळ झाला. ही घटना १० नोव्हेंबरच्या सायंकाळी घडली. या वेळी अन्य पोलिसांनी आक्रमणकर्त्यांवर गोळीबार केला. त्यात तो घायाळ झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. या आक्रमणाच्या पूर्वी सकाळी आक्रमणकर्ता एका पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे त्याने ‘मी एका पोलीस अधिकार्‍याला ठार मारणार आहे’, असे सांगितले होते. या धमकीकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले नाही आणि त्याला पकडूनही ठेवले नाही.

१. बेल्जियमचे पंतप्रधान ॲलेक्झँडर डे क्रू यांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आमचे पोलीस देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. मृत पोलीस अधिकारी आणि घायाळ अधिकारी यांच्या नातेवाइकांविषयी माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की, घायाळ अधिकारी लवकरच बरे होतील.

२. वर्ष २०१६ मध्ये ब्रसेल्सच्या मेट्रो आणि विमानतळ येथे झालेल्या बाँबस्फोटांमध्ये ३२ जण ठार झाले होते.