भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी दाऊदने पाठवले होते १३ कोटी रुपये !

कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम (उजवीकडे)

नवी देहली – भारतात जिहादी आतंकवादी आक्रमणे करण्यासाठी कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकील यांनी पाकिस्तानमधून दुबई मार्गे सूरत अन् तेथून मुंबईत हवालामार्गे (अवैधरित्या पैशांचे हस्तांतरण) १३ कोटी रुपये पाठवले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिली. गेल्या ४ वर्षांत ही रक्कम पाठवली आहे. मुंबईतील आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना नुकतेच २५ लाख रुपये पाठवल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. राशिद मरफानी उपाख्य राशिद भाई दुबईतून पैसे पाठवण्याचे काम करत होता.

एन्.आय.ए.च्या आरोपपत्रात म्हटले आहे की, दाऊदच्या निशान्यावर भारतातील मोठे राजकीय नेते आणि काही नामांकित लोकांचा समावेश आहे. त्याने वेगवेगळ्या शहरांमध्ये दंगली घडवण्यासाठीही पैसे पाठवले होते. यात नवी देहली आणि मुंबई यांचा समावेश होता.

संपादकीय भूमिका

  • दाऊद अद्यापही पाकिस्तानमध्ये बसून भारतात कारवाया करण्याची शक्ती बाळगतो, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
  • आतापर्यंत दाऊदला भारतात परत आणू न शकणे आणि त्याला शिक्षा करू न शकणे भारताला लज्जास्पद !