कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या ! – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या गारगोटी, इचलकरंजी, तसेच गडहिंग्लज अशा प्रत्येक आगारासाठी २० संख्येने मिळाल्या आहेत. या बसची मालकी खासगी कंत्राटदाराकडे असून गाडीवर चालक खासगी आस्थापनाचा, तर वाहक राज्य परिवहन मंडळाचा असणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर या गाड्या विशेषकरून वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.