आझमगड येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते असलेले दोघे मुसलमान तरुण कह्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथे एका गावामध्ये बहुजन समाज पक्षाची सभा संपल्यानंतर पक्षाचा झेंडा गल्लीमध्ये लावत जाणारे लोक ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना कह्यात घेतले आहे. पप्पू खान आणि खुर्शीद अहमद अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा बनवणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !