उत्तरप्रदेशात मुसलमान तरुणानेच मशिदीत घुसून कुराण जाळले !

मी नाही, तर माझ्या आत्म्याने कुराण जाळले ! – मुसलमान तरुणाचा दावा

ताज महंमद

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – येथील मशिदीमध्ये घुसून कुराण जाळणार्‍या ताज महंमद याला पोलिसांनी अटक केली. तो या मशिदीपासून ३ किलोमीटर दूर असणार्‍या बावूजई मोहल्ल्यात रहाणारा आहे.

१. कुराण जाळल्याची घटना स्थानिकांना समजल्यावर ते मोठ्या संख्येने येथे गोळा झाले. त्यांनी येथे असणारे भाजपचे फलक फाडले आणि त्यांना आग लावली. याची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोचला आणि त्यांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे ताज याला अटक करण्यात आली.

२. पोलीस अधीक्षक एस्. आनंद यांनी सांगितले की, आरोपीची मानसिक स्थिती चांगली नाही, असे वाटते. त्याच्या कुटुंबियांना, तसेच इस्लामच्या अभ्यासकांनाही बोलावण्यात आले आहे. या घटनेविषयी ताज याला विचारण्यात आले असता तो म्हणाला की, मी कुराण जाळले नाही, तर माझ्या आत्म्याने जाळले. मी काही काम करत नाहीत. कुटुंबीय माझे लग्न करवून देत नाहीत. त्यामुळे मी त्रस्त आहे.

संपादकीय भूमिका

  • कुराण जाळणार्‍याला तात्काळ अटक झाली नसती, तर या घटनेचे खापर हिंदूंवर फोडून कुणाचातरी शिरच्छेद करण्याची घटना घडली असती, असे कुणाला वाटले  तर चुकीचे ते काय ?