हरियाणा येथे तीन मुलांचा बाप असलेल्या साजीदकडून ११ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार

वासनांध धर्मांध !

फरीदाबाद (हरियाणा) – येथे साजीद नावाच्या धर्मांधाने एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित हिंदु मुलीचे वय ११ वर्षे असून ती ४थीच्या वर्गात शिकत आहे. आरोपी साजीद हा विवाहित असून ३ मुलांचा बाप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी साजीद याला कह्यात घेतले आहे.
याविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना फरीदाबादच्या सेक्टर ५८ ठाणा क्षेत्रातील आहे. ११ वर्षांची पीडित मुलगी तिच्या इतर ५ बहिणी आणि वडील यांच्यासह तेथे रहात होती. आरोपी साजीद त्यांच्या शेजारी रहात होता. साजीदने पीडितेला खाऊचे आमीष दाखवून घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीला धमकावून सलग ६ महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. साजीदच्या सततच्या लैंगिक शोषणामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या आजीला तिच्या शरीरात होत असलेल्या पालटांचा संशय आल्याने तिने पीडित मुलीची  चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. नंतर साजीदच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली.
या घटनेविषयी फरीदाबादच्या हिंदु संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादच्या वाढत्या रोखण्यासाठी सरकार आता तरी काही पाऊले उचलणार का ? तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना तरी याविरोधात आवाज उठवणार का ?