माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी !

माजी महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई – सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची २८ ऑक्टोबर या दिवशी दादर पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमीष दाखवून ९ जणांची १ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जून मासात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी तिघांना अटक केल्यावर त्यांनी चौकशीत पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे चौकशी करण्यात आली.