कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे दर्शन २८ ऑक्टोबरपासून २४ घंटे चालू ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. कार्तिक शुक्ल एकादशी सोहळा ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी होणार आहे. या कालावधीत दर्शनासाठी ८ ते १० लाख भाविक येतात.

२८ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत बंद रहाणार आहेत. या कालावधीत नित्यपूजा, महानैवेद्य, गंधाक्षता हे नित्योपचार चालू रहातील. नित्योपचाराच्या वेळा वगळता श्री विठ्ठलाचे २२ घंटे १५ मिनिटे पददर्शन, तर २४ घंटे मुखदर्शन चालू रहाणार आहे.