चित्रपट-मालिकांद्वारे हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांवर आघात करणार्‍यांना कारागृहात टाकायला हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

आज केवळ ‘रावण-लीला’सारखे चित्रपटच नव्हे, तर मराठी-हिंदी भाषेतील ४८ हून अधिक चित्रपट-मालिकांद्वारे हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांवर आघात केले जात आहेत. अशा निर्मात्यांना कारागृहात टाकायला हवे, तरच इतरांना वचक बसेल. ‘गदर’ या हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव ‘सकिना’ आणि अन्य एका चित्रपटात जॉनी लिव्हर या अभिनेत्याचे ‘अब्दुल्ला’ हे नाव आक्षेप घेतल्यावर चित्रपटातून ते लगेचच पूर्णपणे वगळण्यात आले होते. त्याप्रमाणे हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद का घेतली जात नाही ?