ऊस दर आंदोलकांनी ट्रॅक्टरचे १२ टायर फोडले !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – शेतकर्‍यांच्या उसाला योग्य दर मिळावा, यासाठी ‘ऊस दर संघर्ष समिती’ने चालू केलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देणार्‍या श्री सुधाकरपंत पांडुरंग साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचे टायर आंदोलकांनी धारदार चाकूने फोडले आहेत. आतापर्यंत आंदोलकांनी १२ टायर फोडले असून वाखरी तालुका येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती; तर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.