सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्राणी असतो !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले