माकप सरकारची ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी टीका !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी राज्यातील ९ विश्वविद्यालयाच्या कुलपतींना त्यागपत्र देण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने विश्वविद्यालयाने अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत एपीजे अब्दुल कलाम प्रौद्योगिकी विश्वविद्यालयाच्या कुलपतींचे नियुक्ती रहित करण्याचा आदेश दिला होता. या आदेशावरूनच राज्यपाल खान यांनी केरळ विश्वविद्यालय, म. गांधी विश्वविद्यालय, कोच्चि विश्वविद्यालय ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केरल विश्वविद्यालय ऑफ फिशरीज अँड ओशियन स्टडीज, कन्नूर विश्वविद्यालय, एपीजे अब्दुल कलाम टेक्नॉलॉजी विश्वविद्यालय, श्री शंकराचार्या विश्वविद्यालय ऑफ संस्कृत, विश्वविद्यालय ऑफ कैलिकट, मल्यालम विश्वविद्यालय यांच्या कुलपतींना त्यागपत्र देण्याचा आदेश दिला.
केरल के राज्यपाल आरिफ़ मोहम्मद खान ने 9 यूनिवर्सिटीज़ के VCs का इस्तीफ़ा मांगा
https://t.co/KEQfjgDMOD— AajTak (@aajtak) October 23, 2022
राज्यपाल खान यांच्या या आदेशाला राज्यातील माकप सरकारने भाजप आणि संघ यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. ‘हा आदेश म्हणजे लोकशाहीच्या सर्व सीमांचे उल्लंघन आहे, शिक्षणाचे भगवेकरण करण्याच्या धोरणानुसार सर्व होत आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.