पावसाने मराठवाड्यातील शेतकर्‍यांची मोठी हानी !

लातूर – पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांतील शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. शेतातील उभ्या पिकांत पाणी साचले आहे. पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सोयाबीनची रास करणेही कठीण झाले आहे. या हानीमुळे शेतकर्‍यांनी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे.